रत्नागिरीत पावसाचे थैमान; १२२ मिलिमीटर पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पाऊस सुरू असून, काल (२९ ऑक्टोबर २०२५) रात्री पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सलग तीन-चार तास प्रचंड पाऊस कोसळत होता.

कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची प्रवीण दरेकर यांची मागणी

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. या मदतीचा कोकणातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे निकष बदलून स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली.

शेतीच्या नुकसानाची माहिती ऑनलाइन अर्जाद्वारे पाठवा; रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ऑक्टोबर महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचा पंचनामा करण्यास शासकीय यंत्रणा अद्याप पोहोचली नसेल, तर शेतकऱ्यांनी स्वतः ऑनलाइन अर्ज भरून प्रशासनाकडे माहिती पाठवावी, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.