बालगणेशभक्तांसाठी “बाप्पा माझा लाडोबा” खास गीत!

रत्नागिरी : रत्नागिरीचा पुणे स्थित गायक, गीतकार, संगीतकार अभिजित नांदगावकर यावर्षी गणेशोत्सवात बालगणेशभक्तांसाठी “बाप्पा माझा लाडोबा” हे खास गीत घेऊन आला आहे. अभिजितने हे गीत शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे. पुण्यातील बालगायक कलाकार शौर्य बालाजी घाडगे याने हे गीत गायले आहे.