बालगणेशभक्तांसाठी “बाप्पा माझा लाडोबा” खास गीत!

रत्नागिरी : रत्नागिरीचा पुणे स्थित गायक, गीतकार, संगीतकार अभिजित नांदगावकर यावर्षी गणेशोत्सवात बालगणेशभक्तांसाठी “बाप्पा माझा लाडोबा” हे खास गीत घेऊन आला आहे. अभिजितने हे गीत शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे, तर पुण्यातील बालगायक कलाकार शौर्य बालाजी घाडगे याने हे गीत गायले आहे.

या गीताची संकल्पना, बालगायक शौर्यचे वडील बालाजी घाडगे यांनी अभिजित यांच्याकडे मांडली. त्यानुसार अभिजित यांनी हे गीत तयार केले. निर्मितीसाठी बालाजी व निशा घाडगे यांचे बहुमोल योगदान लाभले. गीताचे संगीत संयोजन प्रसिद्ध संगीतकार मयूरेश माडगावकर यांनी केले आहे. तर अरेंजमेंट-प्रोग्रॅमिंग चिन्मय पंडित यांनी, तसेच रेकॉर्डिंग, बॅलन्सिंग, मिक्सिंग, मास्टरिंग चिन्मय जोग यांचे आहे. गीताचे रेकॉर्डिंग संचालक संदीप पाटणकर यांच्या पुण्यातील ग्रेसनोट स्टुडिओमध्ये झाले आहे.

व्हिडीओग्राफी संतोष मेमाणे, गणेश नानेकर, ध्रुव घाडगे यांची असून व्हिडीओ एडिटिंग पुण्यातील एसआरएस स्टुडिओजचे शुभम शिंदे यांचे आहे. गीतासाठी केदार जोशी, श्री गणपती मूर्ती स्टॉल-मोशी, गणेश नानेकर यांची सहकार्य लाभले आहे. बालगणेशभक्तांनी “बाप्पा माझा लाडोबा” आवर्जून ऐकावे, असे आवाहन अभिजित नांदगावकर यांनी केले आहे.

या गीतासाठी रत्नागिरीतील कांचन डिजिटलचे फोटोग्राफर कांचन मालगुंडकर मुख्य प्रायोजक आहेत. भावनाप्रधान शब्द आणि चालीमुळे हे गीत बालगणेशभक्तांना आवडेल, असा विश्वास श्री. नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे. हे गीत Abhijeet Nandgaonkar official आणि Ghadage Brothers-Rising Stars या यूट्यूब चॅनलवर रिलीज झाले आहे. https://youtu.be/epl9apyLEB4 या लिंकवर ते पाहता येईल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply