गेल्या १४ वर्षांपासून रत्नागिरीजवळच्या कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीय इको-फ्रेंडली बाप्पा साकारत आहेत. यावर्षी एकजुटीने भ्रष्टाचाराची हंडी फोडणारा बाप्पा साकारण्यात आला आहे.
इको-फ्रेंडली बाप्पा म्हणजे पर्यावरणपूरक वस्तूंनी साकारलेला बाप्पा, ज्या बाप्पामुळे पर्यावरणातील कोणत्याच घटकाला हानी पोहोचत नाही, असा हा वर्तक कुटुंबीयांचा इको-फ्रेंडली बाप्पा. त्यासाठी पर्यावरणपूरक वस्तू पुठ्ठा, कागद, दोरा, पिठाची चिक्की, कापड, वडाच्या पारंब्या, तशाच टाकाऊ वस्तू वापरण्यात आल्या आहेत.
या कलाकृतीतून देशात चाललेला वाढता भ्रष्टाचार, घोटाळे आणि धर्मावरून चाललेले राजकारण या सर्वांवर भक्तिमार्गातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचार आणि धर्माचे राजकारण यामधून होणारी गोरगरीब जनतेची पिळवणूक आणि महागाई कुठेतरी थांबली पाहिजे, म्हणून वर्तक कुटुंबीयांचा बाप्पा सर्वधर्मीय लोकांना घेऊन भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहे.
भ्रष्टाचार आणि घोटाळे या सर्वांमुळे सामान्य जनतेचे होणारे हाल, देशाच्या प्रगतीवर होणारा परिणाम, देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम हे सर्व कुठेतरी थांबू दे, अशी प्रार्थना उंदीर मामा बाप्पाच्या चरणी करत आहे.
वर्तक कुटुंबीयांचा इको-फ्रेंडली राजा पाहण्यासाठी पत्ता असा –
संजय जगन्नाथ वर्तक,
158, दुर्वांकर, उत्कर्षनगर,
वैभव सोसायटी, कुवारबाव, रत्नागिरी
(संपर्क ः 9421231963, 8446274460, 7972494878)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

