रत्नागिरी : कुवारबाव येथील श्री महालक्ष्मी मंडळ मैदानावर आयोजित विशाल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर, पोमेंडी परिसरातील हजारो हिंदू बंधू-भगिनींच्या उपस्थितीमुळे संमेलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.