भाजपाच्या तीनमजली कार्यालयाचे कुवारबाव येथे भूमिपूजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या भव्य तीन मजली स्वतंत्र कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन कुवारबाव येथे करण्यात आले.

स्वमालकीच्या या कार्यालयाचे भूमिपूजन भाजपाचे नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज भाजपाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून करण्यात आले.

कुवारबाव येथे मुख्य महामार्गानजीकच लागून अरिहंत प्राइम या इमारतीच्या आवारात सुसज्ज कार्यालय उभारण्यात येणार आहे. सुमारे २४ हजार चौरस फुटांचे हे कार्यालय असून तीन मजली इमारत आहे. यात दोन सभागृहे, कार्यालय विभाग, भाजपाच्या महनीय व्यक्तींसाठी निवास, पार्किंग, लिफ्ट अशा सोयीसुविधा असतील. कोकणात भाजपाची ताकद वाढत असल्याचे हे लक्षण आहे.

आज भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सरचिटणीस सतेज नलावडे, सचिन वहाळकर, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, अनिकेत पटवर्धन, मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे आणि दादा दळी, शहराध्यक्ष राजन फाळके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषीकेश केळकर, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शिल्पा मराठे, धनंजय मराठे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, नंदू चव्हाण, विक्रम जैन, प्रशांत डिंगणकर, राजू भाटलेकर, नितीन जाधव, प्रवीण देसाई, लीलाधर भडकमकर यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक या वेळी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply