आणीबाणीविरोधातील आंदोलन म्हणजे देशासाठी केलेला त्याग : खासदार नारायण राणेंनी केला सत्याग्रहींचा सन्मान

अशा त्यागी व्यक्तींचा सन्मान माझ्या हस्ते होणं हे मी माझं भाग्य समजतो. हा कृतज्ञतेच्या भावनेतून केलेला सन्मान आहे,’ असं प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केलं. संविधान हत्या दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाने रत्नागिरीत आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

रत्नागिरी पालिकेवर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना–भाजपा महायुतीने ३२ पैकी २९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

लांज्यात महायुतीला दोनतृतीयांश बहुमत

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने दोनतृतीयांश बहुमत मिळविले आहे. नगरसेवकपदाच्या एका जागेसह १८ जागा असलेल्या लांजा नगर पंचायतीत एकतृतीयांश म्हणजे ६ जागा अपक्षांनी मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सावली सुनील कुरूप यांची निवड झाली आहे.

खेड पालिकेत महायुतीचे शंभर टक्के सत्ता

खेड : खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने शंभर टक्के सत्ता प्रस्थापित केली आहे. पालिकेत विरोधी पक्षाच्या एकाही उमेदवाराला नगरसेवक पद मिळू शकले नाही.

गुहागरमध्ये पितापुत्र विजयी, सत्ता महायुतीकडे

गुहागर : गुहागर नगर पंचायतीच्या गेल्या २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत महायुतीकडे सत्ता गेली आहे. दोन प्रभागांमध्ये पिता आणि पुत्र वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवून निवडून आले.

राजापूर पालिकेवर एका मताने महाविकास आघाडीची सत्ता

राजापूर : राजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीला एका मताने सत्ता प्रस्थापित करता आली. नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी महायुती आणि महाआघाडीला प्रत्येकी १० जागा मिळाल्या, तर नगराध्यपदी काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे निवडून आल्याने सत्ता महाविकास आघाडीकडे गेली.