रत्नागिरी पालिकेवर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना–भाजपा महायुतीने ३२ पैकी २९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

नगराध्यक्षपदासह पालिकेत संपूर्ण सत्ता महायुतीकडे आली असून, केवळ ३ जागांवर शिवसेना (उबाठा) पक्षाला यश मिळाले आहे. महायुतीच्या निवडून आलेल्या २९ उमेदवारांपैकी शिवसेनेचे २६, तर भाजपचे ३ नगरसेवक आहेत. महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ. शिल्पा सुर्वे नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. पालिकेचे एकूण १६ प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून द्यायचे होते.

पालिकेचा प्रभागनिहाय निकाल असा –

▪️ प्रभाग १ – वैभवी विजय खेडेकर (शिवसेना), नितीन जाधव (शिवसेना)

▪️ प्रभाग २ – स्मितल सुरेश पावस्कर (शिवसेना), निमेश विजय नायर (शिवसेना)

▪️ प्रभाग ३ – प्रीती रवींद्र सुर्वे (शिवसेना), राजन रामकृष्ण शेट्ये (शिवसेना)

▪️ प्रभाग ४ – केतन शेट्ये, फौजिया तन्वीर मुजावर (उबाठा), केतन उमेश शेट्ये (उबाठा)

▪️ प्रभाग ५ – सौरभ सुरेश मलुष्टे (शिवसेना), पूजा दीपक पवार (शिवसेना)

▪️ प्रभाग ६ – राजीव कीर (शिवसेना), मेघा अविनाश कुलकर्णी (शिवसेना)

▪️ प्रभाग ७ – श्रद्धा संजय हळदणकर (शिवसेना), गणेश कमलाकर भारती (शिवसेना)

▪️ प्रभाग ८ – नाहीदा तन्वीर सोलकर (शिवसेना), बाळू ऊर्फ दत्तात्रय विजय साळवी (शिवसेना)

▪️ प्रभाग ९ – विजय गोविंद खेडेकर (शिवसेना), सौ. सायली विकास पाटील (शिवसेना)

▪️ प्रभाग १० – मानसी सचिन करमरकर (भाजप), राजेश कृष्णा तोडणकर (शिवसेना)

▪️ प्रभाग ११ – समीर जगन्नाथ तिवरेकर (भाजप), सुप्रिया संदीपक रसाळ (शिवसेना)

▪️ प्रभाग १२ – जागृती राहुल विलणकर (शिवसेना), राकेश (बाबा) चंद्रकांत नागवेकर (शिवसेना)

▪️ प्रभाग १३ (मिरकरवाडा) – आफ्रिन ओबेदुल्लाह होडेकर (शिवसेना), सुहेलअब्दुललतीफ साखरकर (शिवसेना)

▪️ प्रभाग १४ – निवेदिता निकेश कळंबटे (शिवसेना), संतोष दत्तात्रय कीर (शिवसेना)

▪️ प्रभाग १५ – वर्षा पशुराम ढेकणे (भाजप), अमित वसंत विलणकर (उबाठा)

▪️ प्रभाग १६ – रुक्सार जकी खान (शिवसेना), सोहेल महंमद मुकादम (शिवसेना)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply