लांज्यात महायुतीला दोनतृतीयांश बहुमत

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने दोनतृतीयांश बहुमत मिळविले आहे. नगरसेवकपदाच्या एका जागेसह १८ जागा असलेल्या लांजा नगर पंचायतीत एकतृतीयांश म्हणजे ६ जागा अपक्षांनी मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सावली सुनील कुरूप यांची निवड झाली आहे.

नगरसेवकपदाच्या १७ पैकी १० जागा महायुतीला मिळाल्या. त्यापैकी शिवसेनेचे ९ आणि भाजपचा १ उमेदवार विजयी झाला. उर्वरित सहा जागांवर अपक्ष उमेदवार विजयी ठरले. शिवसेना उबाठा पक्षाला एकमेव जागेवर समाधान मानावे लागले.

नगरसेवकपदासाठी एकूण ५७ उमेदवार रिंगणात होते. लांजा नगर पंचायतीतील प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे –

प्रभाग १ : निधी गुरव (शिवसेना)
प्रभाग २: पंढरीनाथ माय शेट्ये (शिवसेना)
प्रभाग ३: श्रद्धा संजय तोडकरी (शिवसेना)
प्रभाग ४: सुशीला कांबळे (शिवसेना उबाठा)
प्रभाग ५: सिद्धेश भोवड (अपक्ष)
प्रभाग ६: योगेश कावतकर (शिवसेना)
प्रभाग ७: प्रांजल यादव (शिवसेना)
प्रभाग ८: मिलिंद लांजेकर (अपक्ष)
प्रभाग ९: रफिक नाईक (अपक्ष)
प्रभाग १०: प्रणाली तेली (भाजप)
प्रभाग ११: नीलिमा कनावजे (शिवसेना)
प्रभाग १२: वंदना काडगाळकर (अपक्ष)
प्रभाग १३: साक्षी मानकर (शिवसेना)
प्रभाग १४: वैभव जोईल (शिवसेना)
प्रभाग १५: मनोहर बाईत (शिवसेना)
प्रभाग १६: अनिल गुरव (अपक्ष)
प्रभाग १७: नेहा राडये (अपक्ष)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply