खेड पालिकेत महायुतीचे शंभर टक्के सत्ता

खेड : खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने शंभर टक्के सत्ता प्रस्थापित केली आहे. पालिकेत विरोधी पक्षाच्या एकाही उमेदवाराला नगरसेवक पद मिळू शकले नाही.

खेड पालिकेच्या १० प्रभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक असे एकूण २० नगरसेवक निवडून देण्यासाठी गेल्या २ डिसेंबर रोजी निवडणूक झाली. त्यामध्ये १७ जागी शिवसेनेचे, तर ३ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र योगेश कदम यांनी ही किमया घडवून आणली आहे. रामदास कदम खेडमधून आमदार म्हणून प्रथम निवडून आल्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत सर्वत्र केवळ शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले होते. विरोधी पक्षातील एकाही उमेदवाराला यश मिळाले नव्हते. त्याचीच एक प्रकारे पुनरावृत्ती यावेळी झाली. या निवडणुकीत भाजपबरोबर युती असल्याने शिवसेनेने तीन जागा भाजपला दिल्या होत्या. त्यासह सर्व वीसही जागा महायुतीने जिंकल्या आहेत.

थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्याच माधवी राजेश बुटाला निवडून आल्या. त्यांच्यासह खेड पालिकेत सर्व २१ जागा महायुतीने जिंकल्या आहेत.

खेड पालिकेतील प्रभागनिहाय विजेते उमेदवार असे –

प्रभाग १ अ –
वर्षा तुषार सापटे (शिवसेना)
प्रभाग १ ब – निकेतन अनंत पाटणे (शिवसेना)

प्रभाग २ अ –
दीप्ती दत्ताराम शिगवण (शिवसेना)
प्रभाग २ ब –
रहिम युसुफ सहिबोले (भाजप)

प्रभाग ३ अ –
नीता केतन आंब्रे (शिवसेना)
प्रभाग ३ ब –
सुनील बाबूराव दरेकर (शिवसेना)

प्रभाग ४ अ –
अंजुम जबीर कुरणे (शिवसेना)
प्रभाग ४ ब –
तौसीफ अब्दुल कादिर खोत (शिवसेना)

प्रभाग ५ अ –
यश राकेश खेडेकर (शिवसेना)
प्रभाग ५ ब –
आरती महेंद्र पवार (शिवसेना)

प्रभाग ६ अ –
वैभवी वैभव खेडेकर (भाजप)
प्रभाग ६ ब –
सतीश गणपत चिकणे (शिवसेना)

प्रभाग ७ अ –
स्वप्नील पांडुरंग सैतवडेकर (शिवसेना)
प्रभाग ७ ब –
स्वप्नाली राकेश चव्हाण (भाजप)

प्रभाग ८ अ –
प्रेमळ श्रीधर चिखले (शिवसेना)
प्रभाग ८ ब –
संजना संजय कुडाळकर (शिवसेना)

प्रभाग ९ अ –
रसिका राकेश खेडेकर (शिवसेना)
प्रभाग ९ ब –
भूषण शांताराम चिखले (शिवसेना)

प्रभाग १० अ –
रेश्मा अब्दुल रऊफ खतीब (शिवसेना)
प्रभाग १० ब –
आरीफ फकी महमद मुल्लाजी (शिवसेना)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply