गुहागर : गुहागर नगर पंचायतीच्या गेल्या २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत महायुतीकडे सत्ता गेली आहे. दोन प्रभागांमध्ये पिता आणि पुत्र वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवून निवडून आले.
महायुतीच्या १३ नगरसेवकांबरोबरच भाजपच्या सौ. नीता मालप नगराध्यक्षपदी निवडून आल्या. विरोधकांना ४ नगरसेवकपदांवर समाधान मानावे लागले. भाजपचे ६, तर शिवसेने ७ उमेदवार निवडून आले. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला २, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला प्रत्येकी एक जागा मिळाली. प्रभाग १३ मध्ये शिवसेनेतर्फे राजेंद्र भागडे तर प्रभाग १४ मधून त्यांचे पुत्र सौरभ भागडे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विजयी झाले.
नगरसेवकपदाचे प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे –
प्रभाग १ – समीर यशवंत बागकर (उबाठा)
प्रभाग २ – उमेश भोसले (भाजप)
प्रभाग ३ – स्वरा तेलगडे (शिवसेना)
प्रभाग ४ – कोमल दर्शन जांगळी (मनसे)
प्रभाग ५ – सौ. वैशाली मावळंकर (भाजप – बिनविरोध)
प्रभाग ६ – सौ. अनुषा भावे (भाजप)
प्रभाग ७ – विदिशा दणदणे (शिवसेना)
प्रभाग ८ – सुषमा रहाटे (भाजप)
प्रभाग ९ – सौ. मीरा घाडे (भाजप)
प्रभाग १० – प्रदीप बेंडल (शिवसेना)
प्रभाग ११ – प्रवीण रहाटे (उबाठा)
प्रभाग १२ – सौ. विशाखा सोमण (भाजप)
प्रभाग १३ – राजेंद्र भागडे (शिवसेना)
प्रभाग १४ – सौरभ भागडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग १५ – संदेश उदेग (शिवसेना)
प्रभाग १६ – अमोल गोयथळे (भाजप)
प्रभाग १७ – श्रिया मोरे (उबाठा)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

