रत्नागिरी : कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी यावर्षी कल्पवृक्षातून गणपतीबाप्पा साकारला आहे.
संजय जगन्नाथ वर्तक आणि कुटुंबीय गेली १६ वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात. निसर्ग संरक्षणाचा संदेश देणारा देखावा हे त्यांच्या उत्सवाचे वैशिष्ट्य असते. त्यांच्या या उपक्रमाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
यावर्षी त्यांनी कल्पवृक्ष म्हणजे नारळापासून गणपती साकारला आहे. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचे खूप उपयोग आहेत. म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. कल्पवृक्षाचा संदर्भ पुराणांमध्येही आढळतो. नारळाची झाडे कोकण किनारपट्टीला लाभलेली एक सुंदर देणगी आहे. म्हणूनच नारळाच्या झाडाचे महत्त्व पुन्हा एकदा समाजाला समजावे आणि समाज जागरूक व्हावा, तसेच नारळाची जास्तीत जास्त लागवड करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी संपूर्ण नारळाच्या झाडापासून श्री. वर्तक यांच्याकडे देखावा साकारलेला आहे. कल्पवृक्ष लावा कल्पवृक्ष वाचवा ही या देखाव्याची संकल्पना आहे.
हा देखावा पाहण्यासाठी श्री. वर्तक यांचा पत्ता असा – श्री. संजय जगन्नाथ वर्तक,
१५८, दुर्वांकर, उत्कर्ष नगर, वैभव सोसायटी, कुवारबाव, रत्नागिरी.
संपर्क क्रमांक – 9421231963 / 8446274460 / 7745807071

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

