भारताला पुन्हा सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी अध्यात्माची शक्ती आवश्यक – श्रीपाद नाईक

रत्नागिरी : कोणे एकेकाळी जगात सर्वोच्च स्थानी असलेल्या भारताला पुन्हा एकदा त्या स्थानापर्यंत पोहोचवायचे असेल तर भारतीय अध्यात्माची, त्यातील भक्तीतून येणाऱ्या शक्तीची वासुदेवानंद सरस्वती यांच्यासारख्या थोर विभूतींची शिकवण पुढच्या पिढीपर्यंत नेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

मालतीबाई-बाबुराव जोशी दांपत्याने पेटवली स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत – श्रीपाद नाईक

रत्नागिरी : कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी सामाजिक सेवेसाठी शिक्षण क्षेत्र निवडले. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त, गुरफटलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी या दांपत्याने स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आणि र. ए. सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीपाद नाईक यांची फेरनिवड

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी आणि पदाधिकारी निवडण्यासाठी काल (दि. १५ मे) झालेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.