रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीपाद नाईक यांची फेरनिवड

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी आणि पदाधिकारी निवडण्यासाठी काल (दि. १५ मे) झालेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. त्यांनी श्रीकांत वैद्य यांचा २३८ मतांनी पराभव केला.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल (दि. १५ मे) मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ३७ पदांसाठी ६६ उमेदवारांनी निवडणूक लढविली. अरुअप्पा जोशी पॅनेल विरुद्ध संस्था पॅनेल अशी ही निवडणूक होती. अध्यक्ष, कार्यवाह आणि सहकार्यवाहपदाच्या प्रत्येकी एका पदासाठी प्रत्येकी २, उपाध्यक्षपदाच्या ३ जागांसाठी ५, विश्वस्तपदाच्या ३ जागांसाठी ६, सल्लागार मंडळाच्या १० जागांसाठी १४, नियामक मंडळाच्या १८ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणूक लढवत होते. काल दिवसभरात एकूण १ हजार ७३ मतदारांपैकी ६७३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. आज मतमोजणी झाली. त्यामध्ये श्रीपाद नाईक यांच्यासह नृसिंह तथा अरुअप्पा पॅनेलचे सर्व ३७ उमेदवार विजयी झाले. विरोधातील संस्था पॅनेलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

निवडणुकीचा सविस्तर निकाल असा – (पद, उमेदवार आणि मिळालेली मते या क्रमाने) –
अध्यक्ष : श्रीपाद येसो नाईक (४५५),श्रीकांत (भाऊ) पांडुरंग वैद्य (२१७). (अवैध मत १)

उपाध्यक्ष : डॉ. मुकुंद मनोहर जोशी (४८८), अॅड. विलास सदाशिव पाटणे (५००), अॅड. प्रदीप पंढरीनाथ नेने ४६४). कमलाकर (भाऊ) आत्माराम देसाई (२०३), मनोहर यशवंत भिडे (२०३). (अवैध मते ७).

कार्यवाह : सतीश मधुसूदन शेवडे ३८२). माधव अनंत पालकर (२८३). (अवैध मते ८).

सहकार्यवाह : श्रीकांत रमेश दुदगीकर (४८८). नरेंद्र (नाना) जगन्नाथ पाटील (१७७). (अवैध मते ८).

विश्वस्त मंडळ : रवींद्र (मुन्नाशेठ) प्रभाकर सुर्वे (४५०), लीलाधर (राजन) विष्णू जोशी (४३८), विवेक जगन्नाथ भावे (३५०). सीए श्रीरंग पांडुरंग वैद्य (२८७), हरिश्चंद्र गणपत गीते (१९९), सुधीर (अप्पा) गणपत वणजू (१७८). (अवैध मते १०).

सल्लागार मंडळ : सीए वरदराज श्यामसुंदर पंडित (५१५), भारत वसंत फडके (५०१), डॉ. सुजय सदाशिव लेले (५१३), निनाद मनोहर जोशी (५०७), संतोष तुकाराम गुरव (४६०), दत्तात्रय (नाना) अनंत शिंदे (५०१), डॉ. श्रीराम विश्वनाथ केळकर (५३७), उमेश राजाराम आपटे (४७९), स्वप्नील रामचंद्र सावंत (४५३), सौ. अनघा श्रीपाद चितळे (४९१). युनूस (बाबूभाई) अब्दुलहमीद पडवेकर (१७०), श्रीकांत अनंत फगरे (३००), मिलिंद गजानन मिरकर (२०२), सॅमसन जेरोड जॉन (१९०). (अवैध मते ३).

नियामक मंडळ : श्रीमती शिल्पा शशिकांत पटवर्धन (४१४), अॅड. विजय मनोहर साखळकर (४२०), अॅड. अशोक शंकर कदम (४१८), हेमंत ऊर्फ विजय रघुनाथ देसाई (४३८), सीए मंदार यज्ञेश्वर गाडगीळ (४६५), अॅड. प्राची नरसिंह जोशी (४९८), राजेंद्र श्यामकांत मलुष्टे (४६४), मनोज विनायक पाटणकर (४४८), सुहास पर्शराम पटवर्धन (४१६), आनंद जयंत देसाई (३९९), डॉ. चंद्रशेखर जगन्नाथ केळकर (४७२), डॉ. कल्पना सुधांशु मेहता (४४३), सीए उमेश रामचंद्र लोवलेकर (३९१), भरत चंदनमल ओसवाल (३८५), अॅड. अविनाश (भाऊ) नामदेव शेट्ये (३९१), डॉ. संजय शांताराम केतकर (४४६), महेश विश्राम नवेले (३५९), सचिन श्रीकांत वहाळकर (४३५). रमेश श्रीधर कीर (२५५), उल्हास घनश्याम लांजेकर (२८४), वीणा श्रीधर सामंत (१७४), लक्ष्मीकांत (प्रदीप) रामचंद्र खेडेकर (२७८), प्रा. प्रभाकर विष्णू केतकर (२२८), दीपक यशवंत साळवी (२१७), सौ. प्रज्ञा प्रमोद भिडे (२७५), उदय श्रीधर लोध (३१४), माधव (बंड्या) मोहन देवस्थळी (२१८), मंदार दत्तात्रय सरपोतदार (२१८), डॉ. अजिज मुबारक पठाण (१७७), राजेंद्र रमेश सावंत (१६८), सदाशिव सीताराम चावरे (१५०), प्रदीप अशोक तेंडुलकर (१८५), तुकाराम सोनू घवाळी (१६५), प्रदीप मधुकर चोडणकर (१२९). (अवैध मते १४).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply