रथसप्तमीनिमित्त एक लाख सूर्यनमस्कार यज्ञ उत्साहात

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने रथसप्तमीनिमित्त आयोजित केलेला १ लाख सूर्यनमस्काराचा यज्ञ उपक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.

स्नेहा साखळकर, गजानन लोंढे, सुरेश बेर्डे यांना पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार रा. भा. शिर्के प्रशालेतील शिक्षिका सौ. स्नेहा साखळकर, कै. मालतीबाई जोशी आदर्श कर्मचारी पुरस्कार जीजीपीएस विद्यालयाचे लिपिक गजानन लोंढे आणि कै. मालतीबाई जोशी आदर्श सेवक पुरस्कार कीर विधी महाविद्यालयातील सेवक सुरेश बेर्डे यांना प्रदान करण्यात आला.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व : अरुअप्पा जोशी

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अरुअप्पा जोशी यांचा २८ फेब्रुवारी हा स्मृतिदिन ! त्यानिमित्ताने या कर्मयोग्याच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा.

छत्रपती शिवाजी महाराज अभियंत्यांचे अभियंता – अविनाश हळबे

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अभियंत्यांचे अभियंता होते, असे प्रतिपादन पुण्यातील अविनाश हळबे यांनी येथे केले.

मालतीबाई-बाबुराव जोशी दांपत्याने पेटवली स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत – श्रीपाद नाईक

रत्नागिरी : कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी सामाजिक सेवेसाठी शिक्षण क्षेत्र निवडले. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त, गुरफटलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी या दांपत्याने स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आणि र. ए. सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केले.

सिंधू-सरस्वती संस्कृती भारतीयांनीच वसवली – ऋत्विज आपटे

रत्नागिरी : सिंधू-सरस्वती संस्कृती भारतीयांनीच वसवली, असे प्रतिपादन संशोधक आणि पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे यांनी केले.