मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात श्रीरंग जोगळेकरला सुवर्णपदक

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील श्रीरंग जोगळेकर याने संवादिनी (हार्मोनियम) वादन प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

कला महोत्सवात ऋग्वेद रेमणे, श्रीरंग जोगळेकर प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित कला महोत्सवात कोंडगाव (ता. संगमेश्वर) येथील युवा तबला वादक ऋग्वेद रेमणे आणि रत्नागिरी येथील संवादिनी वादक श्रीरंग जोगळेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

गोविंदराव पटवर्धन यांना ऑर्गन वाजवून श्रद्धांजली

ज्येष्ठ हार्मोनियम आणि ऑर्गनवादक पंडित गोविंदराव पटवर्धन यांचा सत्ताविसावा स्मृतिदिन ३० जानेवारी २०२३ रोजी झाला. रत्नागिरीत सुरू असलेल्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या वेळी त्यांना श्रीरंग हेरंब जोगळेकर या रत्नागिरीतील उदयोन्मुख कलाकाराने ऑर्गन वाजवून श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे स्पर्धेचे परीक्षक धनंजय पुराणिक (डोंबिवली) यांनी त्याला तबल्याची साथ केली.