मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा १०८वा चैत्रोत्सव १८ एप्रिलपासून

मठ (ता. लांजा) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०८वा चैत्रोत्सव येत्या गुरुवारपासून (१८ एप्रिल २०२४) सुरू होत आहे.

Continue reading

करसेवेतील रोमांचक अनुभवकथनाने पल्लीनाथाचा राम दीपोत्सव वेगळ्याच उंचीवर

मठ (ता. लांजा) : अयोध्येतील राममंदिर पुनर्निर्माण आणि राममूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याच्या दिवशी येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक घटनेचा भाग म्हणून मंदिरात सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत भव्य दिव्य कार्यक्रम पार पडले.

Continue reading

श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात भक्तिभावाने पार पडला ऋग्वेद संहिता स्वाहाकार

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) : येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात अधिक श्रावण मासानिमित्ताने ३० जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार मोठ्या भक्तिभावाने पार पडला. वायंगणी (ता. कणकवली, सिंधुदुर्ग) येथील वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाहाकार झाला. स्वाहाकारासाठी पुण्यातील घनपाठी वेदमूर्ती गोपाळ जोशीही उपस्थित होते. ऋग्वेदातील १० हजार ५०० मंत्रांचे हवन या सप्ताहात झाले.

Continue reading

श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात शनिवारपासून ऋग्वेद संहिता स्वाहाकार

मठ (ता. लांजा) : येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात अधिक श्रावण मासानिमित्ताने येत्या ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार होणार आहे.

Continue reading

संकीर्तनातून रसिकांनी घेतला सांगीतिक समाधीचा अनुभव

रागदारीवर आधारित गीतांच्या नृत्यांमधून साकारलेली कला अनुभवताना संकीर्तन या कार्यक्रमात रसिकांनी सांगीतिक समाधीचा अनुभव घेतला. मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात १०७वा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने मंगळवारी (चार एप्रिल) मिरज येथील रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या नृत्यश्री संस्थेने संकीर्तन हा कार्यक्रम सादर केला.

Continue reading

श्री लक्ष्मीपल्लीनाथाची गाथा ई-बुक स्वरूपात मराठी आणि इंग्रजीत प्रकाशित

श्री लक्ष्मीपल्लीनाथ या देवतेचा इतिहास आणि अन्य महत्त्वपूर्ण संदर्भांची माहिती देणारी ‘गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची’ ही पुस्तिका ई-बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आली आहे. संदीप नाटेकर यांनी केलेल्या त्या पुस्तिकेच्या इंग्रजी अनुवादाचेही ई-बुक प्रकाशित करण्यात आले आहे.

Continue reading

1 2