मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात होतेय भक्तनिवासाची उभारणी; सुमंतबुवांच्या हस्ते भूमिपूजन

लांजा : मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानातर्फे मंदिराच्या शेजारी भक्तनिवासाची उभारणी केली जात आहे. आठ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांच्या हस्ते या भक्तनिवासाचे भूमिपूजन करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी श्री देव लक्ष्मीपल्लीनाथावर रुद्राभिषेक, तसेच वास्तू गण होम आदी धार्मिक विधी करण्यात आले. या वेळी संस्थानचे अध्यक्ष मंदार हळबे, सचिव नंदकुमार नेवाळकर, खजिनदार श्रेयस मुळे, श्रीनिवास गुण्ये, अभय खांडेकर, दीपक भाटे, अभय देवस्थळी, उमेश आंबर्डेकर, राजू केळकर, सतीश चांदोरकर, शशिकांत गुण्ये आदी ट्रस्टी आणि भक्तमंडळी उपस्थित होती. (फोटो आणि व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ हे कोकणातील सुमारे ४० ते ५० कऱ्हाडे ब्राह्मण कुळांचे कुलदैवत आहे. कुलोपासकांनी आपल्या या कुलदैवताचे मंदिर मठ या गावी २०१८ साली उभारले. तत्पूर्वी २०१३पासूनच तेथे घुमटी उभारून चैत्रोत्सव केला जात आहे. मंदिर पूर्ण झाल्यानंतर तर येथे श्रावणोत्सव आणि चैत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जात आहेत. त्याशिवाय, अन्य अनेक उत्सव आणि धार्मिक विधीही वर्षभर वेळोवेळी येथे होत असतात. त्यासाठी देशभरातून कुलोपासक मंदिरात येत असतात. म्हणूनच भक्तनिवास उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येथील चैत्रोत्सवाची ख्याती अल्पावधीतच सर्वत्र पसरली असून, त्या वेळी दूरदूरवरून कुलोपासकांची मोठी गर्दी येथे होते. येत्या चैत्रात (२०२६ साली) या मंदिराच्या प्रांगणातील १४वा चैत्रोत्सव साजरा होणार आहे. तत्पूर्वी या बहुमजली भक्तनिवासाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भक्तांनी या प्रकल्पासाठी यथाशक्ती देणगी द्यावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

बँक खात्याचे तपशील
खात्याचे नाव : श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान
बँक : जनता सहकारी बँक लि., पुणे
शाखा : लांजा
खाते क्रमांक : 053232200000001
IFSC : JSBP0000053
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. मंदार हळबे 9594515999
श्री. राजू नेवाळकर 9270963574
श्री. श्रेयस मुळ्ये 9405917567
श्री. उमेश आंबर्डेकर 9850082437
(फोटो, व्हिडिओ जाहिरातीच्या खाली पाहता येतील.)

व्हिडिओ लिंक https://www.facebook.com/share/r/17Xw7dW1NK

(पूर्वीच्या उत्सवाचे काही व्हिडिओज पाहा पुढील लिंकवर… https://www.youtube.com/playlist?list=PLHLoM_UKj4Gm8JTVK5uoTo5gYKwjd3E-h)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply