रत्नागिरीत उद्या शतसंवादिनी २.०; पं. गोविंदरावांना १०० संवादिनीवादक देणार मानवंदना

पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त ‘चैतन्यस्वर’ आणि ‘सहयोग रत्नागिरी’ यांच्या वतीने २० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात जाई काजळ प्रस्तुत ‘शतसंवादिनी २.०’ हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे.

रत्नागिरीत २० सप्टेंबरला १०० संवादिनीवादक सादर करणार नाट्यगीतांची सिम्फनी

रत्नागिरी : पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त ‘चैतन्यस्वर’ आणि ‘सहयोग रत्नागिरी’ येत्या २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता “शतसंवादिनी २.०” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

माणसाला माणूसपणाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न

एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (६ डिसेंबर २०२२) मड वॉक हे नाटक सहयोग रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे. स्पर्धेच्या युगात माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. अशा वेळी माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे, याची जाणीव करून देणारे हे नाटक आहे.