सावर्ड्याचे पृथ्वी कृष्णकांत पाटील अवघ्या ५ दिवसांत सुपर रँडोनिअर

चिपळूण : ऑडेक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न चिपळूण येथील सह्याद्री रँडोनिअर्सतर्फे आयोजित पाच दिवसीय सुपर रँडोनिअर सिरीजमध्ये सहभागी होत सावर्डे (ता. चिपळूण) येथील पृथ्वी कृष्णकांत पाटील याने अवघ्या पाच दिवसांत सुपर रँडोनिअर होण्याचा पराक्रम केला.

सह्याद्री रँडोनिअर्सच्या रायडर्सचे घवघवीत यश

सह्याद्री रँडोनिअर्स या रत्नागिरी जिल्ह्यातील क्लबच्या अमित कवितके (रत्नागिरी) यांनी एकाच वर्षात तीन वेळा सुपर रँडोनिअर्स, तर अहमद अली शेख (चिपळूण) यांनी एकाच वर्षात दोन वेळा सुपर रँडोनिअर्स हे मानांकन मिळवून सह्याद्री रँडोनिअर्सची कीर्ती भारतभर पसरवली आहे.