“प्र.ल.” माहितीपट ४ एप्रिलला दूरदर्शनवर

रत्नागिरी : मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांच्या ७५ व्या जन्मदिनी येत्या रविवारी, (४ एप्रिल) रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमीने कै. प्र. ल. मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर तयार केलेला माहितीपट सकाळी १० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.