तन्वी मोरे, अर्णव सरपोतदार शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम

गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वराभिषेक-रत्नागिरी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेत पहिल्या गटात अर्णव सरपोतदार, तर दुसऱ्या गटात तन्वी मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

सम्राज्ञी शेलार रंगवणार ‘स्वराभिषेक’ची दिवाळी पहाट मैफल

रत्नागिरी : येथील स्वराभिषेक संस्था आणि जयेश मंगल पार्कतर्फे येत्या मंगळवारी (२१ ऑक्टोबर) दिवाळी पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘स्वराभिषेक’चे शिष्य शास्त्रीय आणि सुगम गायन सादर करणार असून, गोव्यातील प्रसिद्ध गायिका सम्राज्ञी आईर-शेलार यांच्या गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

स्वराभिषेक, कलांगणची रत्नागिरीत शास्त्रीय संगीत मैफल

रत्नागिरी : स्वराभिषेक आणि कलांगण या संस्थांच्या रत्नागिरी आणि मुंबईतील कलाकारांची शास्त्रीय संगीत मैफल रत्नागिरीत येत्या सोमवारी होणार आहे.

रत्नागिरीतील कलाकारांनी मुंबईत रंगवली शास्त्रीय संगीताची मैफल

रत्नागिरी येथील स्वराभिषेक संगीत वर्गाच्या तन्वी मोरे आणि उत्तरा केळकर यांनी मुंबईतील कलाकारांसमवेत दादर (मुंबई) येथील मैफलीत शास्त्रीय गायन सादर करून मुंबईकर रसिकांची मने जिंकली.

स्वराभिषेक-जयेश मंगल पार्कची सूरमयी दिवाळी पहाट उत्साहात

रत्नागिरी : स्वराभिषेक आणि जयेश मंगल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

कलांगण, स्वराभिषेकच्या मैफलीत युवा गायकांचे बहारदार शास्त्रीय गायन

रत्नागिरी : कलांगण (मुंबई) आणि स्वराभिषेक (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर शास्त्रीय मैफल पार पडली.