स्वराभिषेक-जयेश मंगल पार्कची सूरमयी दिवाळी पहाट उत्साहात

रत्नागिरी : स्वराभिषेक आणि जयेश मंगल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. स्वराभिषेक संगीत वर्गाच्या विद्यार्थ्यांनी या मैफलीत शास्त्रीय संगीताबरोबरच एकापेक्षा एक सुगम गीते सादर करून रसिकजनांना मंत्रमुग्ध केले.

निवृत्त प्राचार्य डॉ. दत्ता पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मैफलीचा प्रारंभ झाला. यावेळी अॅड. राजशेखर मलुष्टे, विनया परब, केदार लिंगायत, श्रीयुत तांबे, राजेश घोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दीप्ती आगाशे आणि गौतमी वाडेकर यांनी सादर केलेल्या जौनपुरी रागातील बंदिशीने पहाट मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर सादर झालेल्या अभंगांनी वातावरण भक्तिमय बनवले. ओवी, वासुदेव, जय दुर्गे दुर्गती, दिवाळी येणार, आज अयोध्या सजली, जन विजन झाले, ज्योती कलश, उठ पंढरीच्या, सर्वांगे सुंदर, रुणुझुणू रुणुझुणू रे, जय शारदे वागीश्वरी, आदिमाया अंबाबाई, गगन सदन, जय जय शिवराया, कौसल्येचा राम, पूर्व दिशा उजळली अशा सुमधुर भक्तिगीतांनी, अभंगांनी, जय शंकरा गंगाधरा आदी नाट्यगीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. स्वातंत्र्यवीरा तुझी आरती या गीताने मैफलीची सांगता झाली.

स्वराभिषेकच्या शिष्यवर्गापैकी स्वरा भागवत, आदित्य दामले, सिद्धी शिंदे, तन्वी मोरे, मधुरा लाकडे, स्वरा लाकडे, संस्कृती जोशी, शंतनु पावसकर, मीरा बापट, हर्षदा सावंत, उत्तरा केळकर, स्वरा यादव, विश्वास सनगरे, आर्या काटदरे, अनया वाडेकर, गायत्री पोवार, स्वराणी आडविलकर, विष्णुप्रिया पवार, समीक्षा वाडकर, मीरा सोवनी, स्वरा लाकडे, दुहिता घोलकर, पूर्वा नागवेकर, राधिका ढोल्ये, त्रिवेणी चवंडे यांनी गाणी सादर केली. मनाली नाईक, पूर्वा साने आणि मधुरा लाकडे यांनी निवेदन केले. या मैफलीला हार्मोनियमसाथ महेश दामले, कीबोर्ड-मंगेश मोरे, तबला- केदार लिंगायत, पखवाज- मंगेश चव्हाण, बासरी- मंदार जोशी आणि तालवाद्यांची साथ अद्वैत मोरे यांनी केली. ध्वनी संयोजन एस कुमार साऊंडचे उदयराज सावंत आणि सहकारी यांनी केले.

मैफलीच्या निमित्ताने मधुरा लाकडे यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या पुष्परांगोळीचे अनेकांनी कौतुक केले. मैफल यशस्वी होण्यासाठी जयेश मंगल पार्कचे व्यवस्थापक ओंकार रहाटे, श्री. देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply