जगातील आठवे आश्चर्य असलेल्या अंगकोरवाटमध्ये विष्णू भागवतकथा आणि धर्मयात्रा; अंगकोरवाट भारत फाउंडेशन संस्थेचा शुभारंभ

जगातील आठवे आश्चर्य आणि सर्वांत मोठे मंदिर असलेल्या कंबोडियातील अंगकोरवाट परिसरामध्ये नुकतेच विश्व मंदिर परिषदेद्वारा पहिल्यावहिल्या विष्णू भागवतकथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामजन्मभूमी न्यास अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या अमृतमय वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

हिंदू संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन : सरसंघचालक

पुणे : ‘दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत विषमता निर्मूलनाचा, समरसतेचाच विचार केला. समरसता ही त्यांची श्रद्धा होती. प्रचंड व्यासंग आणि आशयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची दृष्टी होती. त्यातूनच त्यांनी विविध क्षेत्रात संघटना स्थापन केल्या आणि त्यांना देश-काल-परिस्थितीशी सुसंगत असे मार्गदर्शनदेखील केले. हे सर्व करत असताना त्यांनी हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन हे सूत्र कायम बाळगले,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १४ ऑक्टोबर रोजी पुण्यात केले.