रत्नागिरीतील नववर्ष स्वागतयात्रेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी : दोन वर्षांच्या करोनाच्या कालखंडानंतर गुढीपाडव्याला (दि. २ एप्रिल) रत्नागिरीत निघणार असलेल्या नववर्ष स्वागतयात्रेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गुढीपाडव्याला रत्नागिरीत जल्लोषात निघणार नववर्ष स्वागतयात्रा

रत्नागिरीत हिंदू नववर्ष स्वागतयात्रा येत्या २ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सुमारे ७५ संस्थांचे चित्ररथ, वाहने, ढोल, ताशापथके सामील होणार आहेत.