अहमदाबादमध्ये आज दुपारी अपघातग्रस्त झालेल्या विमानातील ‘११ ए’ या सीटवर बसलेला प्रवासी आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. या अपघाताची भीषणता पाहता त्यातील सर्व २४२ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता; मात्र एक प्रवासी जिवंत असल्याचे आढळले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.