रत्नागिरी : थिबा राजवाड्याच्या प्रांगणात ‘आर्ट सर्कल’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १६व्या संगीत महोत्सवाने दर वर्षीप्रमाणेच रसिकांना स्वरानंदाची अनुभूती दिली. २१ आणि २२ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी केलेल्या सादरीकरणातून संगीतप्रेमी रसिकांना नृत्य, ताल, सूर यांचा त्रिवेणी संगम अनुभवता आला. विद्युत रोषणाईत न्हाऊन निघालेल्या थिबा राजवाड्याच्या समोर सादर झालेले शास्त्रीय गायन, सतार एकल वादन आणि ‘तालचक्र’ या सादरीकरणांनी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवले.
