रत्नागिरी : विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी प्रयोगशाळेत रक्ताची निर्मिती करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे माणूस हाच रक्ताचा एकमेव स्रोत असल्याने समाजामध्ये रक्तदानविषयी जागृती निर्माण करून अधिकाधिक नवीन रक्तदाते तयार होण्यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन डॉ. अलिमियाँ परकार यांनी केले.