रत्नागिरी : येथील सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या धन्वंतरी धर्मादाय संस्थेचा दुसरा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) होणार आहे.
धन्वंतरी धर्मादाय संस्था संचालित रक्तसाठवणूक केंद्र तृतीय सेवा वर्षात पदार्पण करत आहे. हा कालावधी मोठा नसला, तरी संस्था तृतीय वर्षात अधिक आत्मविश्वासाने पाऊल ठेवत आहे. यानिमित्ताने रक्तदान शिबीरांचे आयोजन करणाऱ्या विविध सामाजिक संस्था तसेच पत्रकार बंधू, भगिनी, हितचिंतक यांच्या स्नेहमीलनाचा कार्यक्रम येत्या गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या डॉ. संघमित्रा फुले, डॉ. अलिमिया परकार, डॉ. मतीन परकार, अन्न औषध प्रशासन अधिकारी श्री. वाडे, डॉ. श्रीविजय फडके, डॉ. ज्योत्स्ना देशपांडे, डॉ. अरुण डिंगणकर, वैभवीलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक अनमोल कामत उपस्थित राहणार आहेत.
पऱ्याच्या आळीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता सुरू होणार असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9511704655 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
……………………………………………….
धन्वंतरी धर्मादाय संस्था
धन्वंतरी धर्मादाय संस्थेचे रक्तसंकलन केंद्र म्हणजे रत्नागिरीमधील शासकीय रक्तपेढी, रेडक्रॉस रक्तपेढी यांच्याबरोबरच रत्नागिरीतील गरजूंना, रत्नागिरीकरांसाठीच एक तिसरा पर्याय आहे. रुग्ण तसेच रुग्णाचे नातेवाईक, त्यांचा मित्रपरिवार यांची रक्त मिळवताना होणारी तारांबळ, धावपळ कमी व्हावी हाच या रक्तपेढीचा उद्देश आहे.
सामाजिक बांधिलकीतूनच या संस्थेची अशी विचारसरणी आहे की, रत्नागिरीमधील रक्तपेढी आणि साठवणूक केंद्र यांच्यामध्ये व्यावसायिक स्पर्धा न राहता निव्वळ रुग्णसेवेसाठी नि:स्वार्थ सेवा असावी. त्याच दृष्टीने रत्नागिरीमधील रक्तदान शिबिरांमधून अनेक रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या असून त्या रत्नागिरीकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
आर्थिकदृष्ट्या रक्तपिशवी घेणे ज्यांना परवडत नसेल अशांना राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (SBTC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार निःशुल्क रक्तसुद्धा दिले जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क : अध्यक्ष – अजय भिडे (9511704655)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

