गुजरातमध्ये तौते चक्रीवादळाच्या लँडफॉलची प्रक्रिया सुरू

गेले दोन दिवस गोवा-कोकणाच्या समुद्रातून मुंबई-गुजरातच्या दिशेने निघालेल्या तौते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) लँडफॉलची (Landfall) म्हणजेच किनाऱ्यावर धडकण्याची प्रक्रिया गुजरातमध्ये सुरू झाली आहे. भारतीय हवामान खात्याने आज, १७ मे रोजी रात्री साडेआठ वाजता प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे.

चक्रीवादळ अलिबागजवळ धडकण्याची प्रक्रिया सुरू; वाऱ्यांचा वेग १०० किमीहून अधिक

रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाने तीन जूनला दुपारी एक वाजता जाहीर केलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची (लँडफॉल) प्रक्रिया दुपारी साडेबारापासून सुरू झाली आहे. पुढील तीन तासांत ती प्रक्रिया पूर्ण होईल. सध्या चक्रीवादळाच्या व्यासाचे ईशान्येकडील टोक जमिनीवर पोहोचले आहे.