चक्रीवादळ अलिबागजवळ धडकण्याची प्रक्रिया सुरू; वाऱ्यांचा वेग १०० किमीहून अधिक

रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाने तीन जूनला दुपारी एक वाजता जाहीर केलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची (लँडफॉल) प्रक्रिया दुपारी साडेबारापासून सुरू झाली आहे. पुढील तीन तासांत ती प्रक्रिया पूर्ण होईल. सध्या चक्रीवादळाच्या व्यासाचे ईशान्येकडील टोक जमिनीवर पोहोचले आहे.

साडेबारा वाजता चक्रीवादळ अरबी समुद्रात १८.२५ अंश उत्तर आणि ७२.९ अंश पूर्व या अक्षांश-रेखांशावर होते. हे स्थान
अलिबागच्या दक्षिणेला ४० किलोमीटर, मुंबईच्या दक्षिणेला ९५ किलोमीटर, तर सुरतच्या दक्षिणेला ३२५ किलोमीटरवर आहे.

तीन जून २०२० – भारतीय हवामान विभागाने दुपारी एक वाजता प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार निसर्ग चक्रीवादळाची स्थिती

केंद्रबिंदूजवळ वाऱ्यांचा वेग – ताशी १०० ते ११० आणि १२० किलोमीटरपर्यंत

किनाऱ्यांवर वाऱ्यांचा वेग (ताशी किलोमीटर) (तीन जूनला दुपारी १२.३० वाजता)
रत्नागिरी – ३७
हर्णै – ७४
कुलाबा – ९
सांताक्रूझ – १५
डहाणू – ११

पाऊस (मिमी) (तीन जूनच्या सकाळी साडेआठपासून)
रत्नागिरी – ३०
कुलाबा – ७
सांताक्रूझ – ५
डहाणू – १
……….
गेल्या सहा तासांत वादळ ताशी २० किलोमीटर वेगाने ईशान्येकडे सरकले. हे वादळ अतितीव्र रूप धारण करून अलिबागला धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटरपर्यंत असेल.

वाऱ्यांचा वेग असा असेल – (ताशी किलोमीटर)
रायगड, मुंबई आणि ठाणे परिसर – १०० ते १२०
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ठाणे, पालघरचा काही भाग – ८५ ते ९५
वलसाड, नवसारी (गुजरात) – ६० ते ९०
………
लाटांची उंची (मीटर) (नेहमीपेक्षा इतकी जास्त अपेक्षित)
अलिबाग – ०.५ ते १.०
दापोली – ०.७ ते १.०
गुहागर – ०.५ ते ०.७
पेण – ०.६ ते ०.७
ठाणे – ०.६ ते ०.७
समुद्रकिनाऱ्यापासून इतके किलोमीटर आतपर्यंत पाणी जाण्याची शक्यता
रायगड – २.२
अलिबाग – १.४ पर्यंत
दापोली – ०.२पर्यंत
गुहागर – ०.२पर्यंत
पेण – २.२पर्यंत
ठाणे – ०.२पर्यंत

Leave a Reply