चक्रीवादळाची नऊ वाजताची स्थिती… रत्नागिरीत ताशी ५५ किमी वेगाने वारे

तीन जून २०२० – भारतीय हवामान विभागाने सकाळी नऊ वाजता प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार निसर्ग चक्रीवादळाची स्थिती…
……..

साडेआठ वाजताची चक्रीवादळाची अंदाजे स्थिती

तीन जूनला सकाळी साडेआठ वाजता निसर्ग चक्रीवादळाचा केंद्रबिंदू अरबी समुद्रात ७२.३ अंश पूर्व आणि १७.६ अंश उत्तर या अक्षांश-रेखांशावर होता.
हे स्थान अलिबागच्या दक्षिण-नैर्ऋत्येला १३० किलोमीटर अंतरावर
मुंबईच्या दक्षिण-नैर्ऋत्येला १७५ किलोमीटर अंतरावर
सुरतच्या दक्षिण-नैर्ऋत्येला ४०० किलोमीटर अंतरावर

केंद्रबिंदूजवळ वाऱ्यांचा वेग – ताशी १०० ते ११० आणि १२० किलोमीटरपर्यंत
………
किनाऱ्यांवर वाऱ्यांचा वेग (ताशी किलोमीटर) (तीन जूनला सकाळी साडेसात वाजता)
गोवा – सात
रत्नागिरी – ५५ (साडेआठ वाजता)
हर्णै – २६
कुलाबा – १५
सांताक्रूझ – १५
डहाणू – ६
…….
पाऊस (मिमी) (दोन जूनच्या सकाळी साडेआठपासून तीन जूनच्या सकाळी साडेसातपर्यंत)
गोवा – १२७
रत्नागिरी – ३४
हर्णै – २५
कुलाबा – ३९
सांताक्रूझ – २३
डहाणू – ४
……….
गेल्या सहा तासांत वादळ ताशी १३ किलोमीटर वेगाने ईशान्येकडे सरकले. हे वादळ आणखी तसेच पुढे सरकत तीन जूनच्या दुपारपर्यंत अलिबागच्या दक्षिणेला धडकेल. वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटरपर्यंत असेल.

वाऱ्यांचा वेग असा असेल – (ताशी किलोमीटर)
रायगड, मुंबई आणि ठाणे परिसर – १०० ते १२०
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ठाणे, पालघरचा काही भाग – ८५ ते ९५
वलसाड, नवसारी (गुजरात) – ६० ते ९०
………
लाटांची उंची (मीटर) (नेहमीपेक्षा इतकी जास्त अपेक्षित)
अलिबाग – ०.५ ते १.५
पेण – ०.८ ते १.१
ठाणे – ०.५ ते १.१
दापोली – ०.५ ते ०.८
गुहागर – ०.५ ते ०.६
वसई – ०.५ ते ०.६
…..
समुद्रकिनाऱ्यापासून इतके किलोमीटर आतपर्यंत पाणी जाण्याची शक्यता
अलिबाग – १.४ पर्यंत
पेण – २.८पर्यंत
ठाणे – ०.३४पर्यंत
दापोली – ०.१ पर्यंत
गुहागर – ०.२२पर्यंत
वसई – १.११पर्यंत

Leave a Reply