लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता वेगळ्या रांगेची मागणी

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था करावी, अशी मागणी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ आणि रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.