सुधा रिसबूड लिखित व कॉन्टिनेन्टल प्रकाशित ‘अजेय भारत’ (पाचवे शतक ते १२ वे शतक – भारतीय इतिहासाचा देदीप्यमान कालखंड) या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते १३ ऑक्टोबर २०२० रोजी पुण्यात झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
सुधा रिसबूड लिखित व कॉन्टिनेन्टल प्रकाशित ‘अजेय भारत’ (पाचवे शतक ते १२ वे शतक – भारतीय इतिहासाचा देदीप्यमान कालखंड) या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते १३ ऑक्टोबर २०२० रोजी पुण्यात झाले.
पुणे : ‘दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत विषमता निर्मूलनाचा, समरसतेचाच विचार केला. समरसता ही त्यांची श्रद्धा होती. प्रचंड व्यासंग आणि आशयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची दृष्टी होती. त्यातूनच त्यांनी विविध क्षेत्रात संघटना स्थापन केल्या आणि त्यांना देश-काल-परिस्थितीशी सुसंगत असे मार्गदर्शनदेखील केले. हे सर्व करत असताना त्यांनी हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन हे सूत्र कायम बाळगले,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १४ ऑक्टोबर रोजी पुण्यात केले.