करोना खरंच कमी झालाय का?

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा संसर्ग खरंच कमी झालाय का? या प्रश्नाचं उत्तर गांभीर्याने शोधण्याची वेळ आली आहे. आता असं वाटेल की करोना तर गेले १६ महिने आहे. मग आत्ताच असं काय झालं की याचं उत्तर शोधण्याची वेळ आली आहे? याचा विचार आज वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर करावा लागेल.

गणराया, करोनाच्या घोळात सर्वांना चांगली बुद्धी दे!

सर्वच राजकारण्यांना आपापल्या मतदारांना गणपतीला गावी आणायची घाई झाली आहे. पण त्यासाठी गावी राहणाऱ्या लोकांना वेठीस धरू नये, अशी अपेक्षा आहे.

संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया

ची दुसरी लाट जरा कमी होताना दिसत आहे. तरीही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत त्यामध्ये विशेष फरक पडलाय, असं मानण्यासारखी परिस्थिती अजूनही नाही. तरीही गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे ७२ विशेष गाड्या सोडणार आणि एसटी महामंडळ गणपतीसाठी २२०० जादा बसेस सोडणार या दोन बातम्या अस्वस्थ करून गेल्या. गणपतीच्यावेळी उपस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती ही लसीकरण झालेलीच असावी, यासाठी प्रयत्नपूर्वक अभियान राबविणं गरजेचं आहे.