कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील कालावधी दुपटीने वाढवून १२ ते १६ आठवड्यांवर

नवी दिल्ली : कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांचे असावे, अशी शिफारस डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोविड वर्किंग ग्रुपने केंद्र सरकारला केली आहे. सध्या कोविशिल्ड लशीचे दोन डोस सहा ते आठ आठवड्यांच्या अंतराने दिले जात आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ही शिफारस स्वीकारली असून, त्यानुसार आता अंमलबजावणी केली जाणार आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली : भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (८४) यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी ट्विटद्वारे दिले आहे. त्यांच्या फुफ्फुसाला जंतुसंसर्ग झाला होता. तसेच, १० ऑगस्टला त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची बातमी त्यांनी स्वतःच ट्विट करून दिली होती. गेले काही दिवस ते कोमामध्ये आणि व्हेंटिलेटरवर होते.