राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लहान मुलांपर्यंत पोहोचावे – अ‍ॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : महापराक्रमी झाशीच्या राणीचे चरित्र सर्व लहान मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही मुलेच हा इतिहास वाचून इतिहास घडवू शकतील, असा विश्वास येथील विधिज्ञ अॅड. विलास पाटणे यांनी आज येथे व्यक्त केला.

राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श आजच्या मुलींनी समोर ठेवावा : अरुण मुळ्ये

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पानवळ घवाळीवाडी (ता. जि. रत्नागिरी) येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेत राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त १९ नोव्हेंबर २०२२ रोजी अभिवादन कार्यक्रम, व्याख्यान व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.