रत्नागिरी : ”मेरी झांसी नही दूंगी’ अशी गर्जना करत इंग्रजांशी युद्ध करून वीरमरण आलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी प्रतिकूल स्थितीत भारतीयांना प्रेरणा, प्रोत्साहन दिले. त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी आणि युद्धाचे शिक्षण घेतले व त्यात त्या तरबेज झाल्या. या राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श मुलींनी समोर ठेवला पाहिजे. आजच्या समाजातही मुली, युवतींसमोर अनेक आव्हाने उभी असतात. त्यावर मात करण्यासाठी युवतींनी कौशल्ये आत्मसात करावीत,’ असे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक अरुण मुळ्ये यांनी केले. राणी लक्ष्मीबाईंचे स्मारक होणार असून, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. (कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पानवळ घवाळीवाडी (ता. जि. रत्नागिरी) येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेत राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त १९ नोव्हेंबर २०२२ रोजी अभिवादन कार्यक्रम, व्याख्यान व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, शाळा समिती अध्यक्ष रामेश्वर लिंगायत, उपसरपंच रवींद्र मांडवकर, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यकारिणी सदस्य दिलीप ढवळे, मानस देसाई, प्रतिभा प्रभुदेसाई, सचिव शिल्पा पळसुलेदेसाई, शिक्षिका मंजिरी गुणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सांगितले, की गेली पाच वर्षे राणी लक्ष्मीबाईंची जयंती ग्रामीण भागातील शाळेत जाऊन साजरी करत आहोत. याद्वारे राणी लक्ष्मीबाईंचे राष्ट्रकार्य पोहोचवत आहोत. ग्रामीण भागातील शाळाही चांगले उपक्रम राबवत आहेत. त्यांनाही यातून प्रोत्साहन मिळते. त्यांनी घवाळीवाडी शाळेकरिता पाच हजार रुपयांची मदत या वेळी सुपूर्द केली.

मुख्याध्यापिका स्मिता मुळ्ये यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाईंची मोठी फोटोफ्रेम, विद्यार्थ्यांना राणीच्या संक्षिप्त जीवनचरित्राची पुस्तके, शाळेला २५०० रुपयांची शालोपयोगी पुस्तके आणि रोख रक्कम देण्यात आली. शिक्षिका समीक्षा माळवदे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक प्रदीप मोरे यांनी आभार मानले. या वेळी शिक्षक काशिनाथ तांबे, मनोज जुवेकर यांच्यासमवेत विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त जि. प. पानवळ घवाळीवाडी पूर्ण प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धांतील विजेते.
(प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)
मोठा गट –
निबंध स्पर्धा – रिया घवाळी, स्वस्तिक कांबळे, अंतरा कांबळे.
वक्तृत्व – अंतरा कांबळे, स्वस्तिक कांबळे, क्षितिजा मांडवकर.
चित्रकला – प्रेम घवाळी, सुजल मांडवकर, आर्यन आंबेकर.
संगीतखुर्ची- प्रेम घवाळी, संस्कार मांडवकर, गौरव घवाळी.
लंगडी – सुजल मांडवकर, अथर्व तांबे, आर्यन आंबेकर.
लहान गट –
निबंध स्पर्धा – श्रुती घवाळी, पद्मश्री लिंगायत, प्रांजल शिंदे.
वक्तृत्व – पद्मश्री लिंगायत, पूजा घवाळी, निधी घवाळी.
चित्रकला – गौरव घवाळी, मानस कांबळे, सिद्धार्थ घवाळी.
संगीतखुर्ची – स्वराली घवाळी, नुपूर तांबे, पूजा घवाळी.
लंगडी – अदिती आंबेकर, माऊली घवाळी, दूर्वा मांडवकर.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

