महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, भारताचा वैभवशाली इतिहास : धनंजय चितळे

‘महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, तर भारताचा वैभवशाली इतिहास आहे. नीतिमूल्यांपासून मनुष्यस्वभावापर्यंत, युद्धतंत्रापासून व्यवस्थापन कौशल्यापर्यंत आणि अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत सर्वच गोष्टींचे धडे आपल्याला यातून मिळतात. त्यामुळे हे धडे घेण्यासाठी मूळ महाभारताचे बारकाईने वाचन आणि त्यावर चिंतन आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांनी केले.

विकसित भारत हवा; पण शारीरिक आणि भावनिक आरोग्यसंपन्नतेसह : डॉ. उपेंद्र किंजवडेकर

भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांच्या हस्ते रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण झाले. त्या सोहळ्यात ‘स्वास्थ्य : नवी पिढी, नवी आव्हाने’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.

रत्नागिरीत २०-२१ डिसेंबरला “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” व्याख्यानमाला

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २० आणि २१ डिसेंबरला “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दोन्ही पुष्पे प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे गुंफणार आहेत.

विद्यार्थिनी आणि महिलांनी झाशीच्या राणीचा आदर्श घ्यावा : राजू नेवाळकर

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे या वर्षी चांदोर येथील शाळेत झाशीच्या राणीची जयंती साजरी करण्यात आली.

जीवनात सकारात्मकताच यश देते – शोभाताई नाखरे

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या विशेष पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका शोभाताई नाखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शोभाताईंनी सकारात्मकतेवर दिलेले भाषण प्रेरणादायी ठरले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पाच जणांना विशेष पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पाच जणांना विशेष पुरस्कार जाहीर केले आहेत. प्रवीण जोशी, मीरा नाटेकर, डॉ. अश्विनी देवस्थळी, डॉ. अश्विनी गणपत्ये, डॉ. पंकज घाटे यांचा त्यात समावेश आहे.