हिसोआ इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून आस्था संस्थेला थेरपी साहित्य

रत्नागिरी : पुण्यातील हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने येथील आस्था सोशल फाउंडेशनला थेरपी साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपली.

हिसोआचे एचआर मॅनेजर जयदीप मोहिते, असिस्टंट मॅनेजर रोहित वाकळे, झोनल डिस्ट्रिब्यूटर नितीन जोशी, झोनल ब्रँच मॅनेजर कमलेश वर्मा, एरिया सेल्स मॅनेजर मुकेश हातिसकर यांनी आस्था संस्थेचे कार्य समजून घेतले आणि कार्याचा गौरव केला. कंपनीने सामाजिक दायित्व निधीतून पुण्याच्या उर्मी संस्थेच्या माध्यमातून आस्था सोशल फाउंडेशनकडे आज साहित्य सुपूर्द केले. त्यात म्युझिक थेरपी, फिजिओ थेरपी, ऑफिस इक्विपमेंट इत्यादी साहित्याचा समावेश आहे. त्याचा उपयोग दिव्यांग पुनर्वसन कार्यासाठी होणार आहे. ही मदत मिळवून देण्यासाठी उर्मी संस्थेचे राहुल शेंडे यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी पालक आपल्या पाल्यांसह उपस्थित होते. पालकांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला हिसोआचे सिद्धेश ठाकूर, शिशिर रावणंग, रिटेलर विश्वजित कोतवडेकर, सुनील धनावडे, सैफ मुल्ला, सदानंद सोनार, दयाराम सुंडेशहा उपस्थित होते.

आस्था संस्थेप्रमाणेच चिपळूण येथील कोवॅस संस्थेलादेखील हिसोआकडून मदत देण्यात आली. कोवॅसच्या श्रीमती सुमती जांभेकर, श्रीमतीदेशपांडे, श्री. दिवाडकर यांनी ती स्वीकारली.

माता पालकांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून, तर पुष्पगुच्छ देऊन आस्थाच्या खजिनदार साक्षी चाळके यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्थाचे संकेत चाळके, संपदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply