राज्यातील हॉटेल्स, लॉज आठ जुलैपासून सुरू होणार

राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल, लॉज, अतिथीगृहांना आठ जुलैपासून क्षमतेच्या ३३ टक्के सेवा देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अगेन अभियानांतर्गत या व्यवसायांना करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या अटी आणि शर्तींसह सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव; अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

मुंबई : संजय कुमार यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. दरम्यान, एक जुलैपासून मेहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.