संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव; अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

मुंबई : संजय कुमार यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. दरम्यान, एक जुलैपासून मेहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून, गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. १९८४च्या बॅचचे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची, तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील

मेहता यांना मुख्यमंत्री सचिवालयात ६०३ क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
………

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply