राज्यात २३ मार्च २०२०पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांना पेट्रोल, डिझेलच्या पुरवठा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राज्यात २३ मार्च २०२०पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांना पेट्रोल, डिझेलच्या पुरवठा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
‘२२ मार्चच्या मध्यरात्रीपासून राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात करोना संसर्ग टाळण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू झाले आहे. आता प्रत्येकाने स्वत: व स्वत:च्या कुटुंबासाठी प्रशासनाला सहकार्य करून कलम १४४ची प्रभावी अंमलबजावणी करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
या कालावधीत काय करावे, काय करू नये, कोणत्या सेवा सुरू, कोणत्या सेवा बंद राहणार आहेत, याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती..