आता फक्त दुचाकींनाच आणि ठरलेल्या वेळेतच पेट्रोल मिळणार

राज्यात २३ मार्च २०२०पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांना पेट्रोल, डिझेलच्या पुरवठा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर सर्व प्रकारची तीन चाकी वाहने, हलकी वाहने (कार), मध्यम वजनाची वाहने, अवजड वाहने यांना प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी पेट्रोल आणि डिझेल वितरित केले जाऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. ही बंदी २३ मार्चपासून पुढील आदेश मिळेपर्यंत असेल. केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित वाहतूक करणाऱ्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या मोठ्या वाहनांनाच इंधन दिले जाईल.


सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांना सकाळी १० ते दुपारी एक आणि संध्याकाळी चार ते सहा या वेळेत इंधन दिले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची फाइल देत आहोत. ती डाउनलोड करून संपूर्ण माहिती घेता येईल.

Leave a Reply