रत्नागिरी : ‘शेअर बाजार पडतो, तेव्हा सगळे शेअर पडत नसतात. त्यामुळे शेअर बाजार पडत असतानाही त्यातून चांगला नफा कमावणे शक्य आहे. नेमका अभ्यास, घडामोडींवर चौफेर लक्ष आणि त्याला योग्य तर्काची जोड असेल, तर शेअर बाजाराच्या आगामी वाटचालीचा जास्तीत जास्त अचूक अंदाज बांधता येऊ शकतो,’ असे प्रतिपादन शेअर बाजार या विषयावरील संशोधक आणि प्रत्यक्ष ट्रेडिंगचा अनुभव असलेले तरुण प्राध्यापक शौनक माईणकर यांनी केले.
