रत्नागिरी : दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची साहित्यिक ठेव आहे. ती लेखकाच्या जडणघडणीची प्रयोगशाळा आहे. मराठीमध्ये दिवाळी अंकांची अतिशय समृद्ध परंपरा आहे. इतर कुठल्याही भारतीय भाषेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर दिवाळी अंक प्रकाशित होत नाहीत. शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना साप्ताहिक बलवंतच्या दिवाळी अंकाचे महत्त्व रत्नागिरीवासीयांसाठी अधिक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, कोकणचे अभ्यासक विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले.