रत्नागिरीच्या श्री रामनाथ हॉस्पिटलला सर्वोच्च गुणवत्तेचे एनएबीएच मानांकन

रत्नागिरी : देशातील वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेचे मानक असलेल्या सर्वोच्च संस्था नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर यांच्या वतीने रत्नागिरीच्या श्री रामनाथ हॉस्पिटल, लोटलीकर हॉस्पिटलला सर्वोच्च गुणवत्तेसाठी दिले जाणारे एनएबीएच मानांकन प्राप्त झाले आहे.

कोकणातील पहिली गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी अँड हिपॅटोबिलिअरी सायन्सेस इन्स्टिट्यूट रत्नागिरीत

रत्नागिरी : येथील डॉ. संजय लोटलीकर यांच्या रामनाथ हॉस्पिटलमध्ये कोकणातील पहिल्या ममता गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी अँड हिपॅटोबिलिअरी सायन्सेस इन्स्टिट्यूटचे उद्घाटन आज झाले. रत्नागिरीतील पहिले पदव्युत्तर पदवीधारक डॉक्टर आणि ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रमेश चव्हाण यांनी उद्घाटन केले.