रत्नागिरी : आद्य शंकराचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाने सभा गाजवल्या आणि पुन्हा वैदिक हिंदू धर्म प्रस्थापित केला. हाच खरा शांकर दिग्विजय आहे, असे प्रतिपादन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : आद्य शंकराचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाने सभा गाजवल्या आणि पुन्हा वैदिक हिंदू धर्म प्रस्थापित केला. हाच खरा शांकर दिग्विजय आहे, असे प्रतिपादन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले.
वैशाख शुद्ध पंचमी अर्थात आद्य शंकराचार्य जयंती. हा दिवस रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत दर वर्षी साजरा केला जातो.
वैदिक मार्तंड व वैदिक शिरोमणी वे. मू. कै. विनायक सीताराम आठल्ये गुरुजी आणि व्याकरणाचार्य कै. पु. ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फाल्गुन शुद्ध चतुर्थी ते फाल्गुन शुद्ध अष्टमी शके १९४४ (२३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२३) या कालावधीत हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
वेद आणि शास्त्र या विषयातील रत्नागिरी जिल्ह्यातील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत नुकतेच विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.