रत्नागिरीत ‘शांकरदिग्विजय’ विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : वैशाख शुद्ध पंचमी अर्थात आद्य शंकराचार्य जयंती. हा दिवस रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत दर वर्षी साजरा केला जातो. यंदा आद्य शंकराचार्य जयंतीचे औचित्य साधून २५ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता संस्कृत पाठशाळेत ‘शांकरदिग्विजय’ या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे आणि सचिव जयराम आठल्ये यांनी केले आहे.

(गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाची झलक खालील व्हिडिओत.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply