उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, की ‘लोकांच्या आरोग्याला घातक असलेलं कोणतंही काम सरकार करणार नाही. प्रदूषणकारी प्रकल्पांना कोकणात आळा घातला जाईल.’
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, की ‘लोकांच्या आरोग्याला घातक असलेलं कोणतंही काम सरकार करणार नाही. प्रदूषणकारी प्रकल्पांना कोकणात आळा घातला जाईल.’
‘कोकणात भरपूर क्षमता आहे. कोकणातलं शेतीक्षेत्र छोटं आहे. म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांना गटशेतीकडे वळवलं पाहिजे. त्यातून शेतीमालाचा ब्रँड तयार होतो आणि विपणन सोपं होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. म्हणूनच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे. शेतकरी अन्नदाता आहे. त्याला कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे. तरच शेतकरी समृद्ध होईल. इथे उदरनिर्वाह होत नाही म्हणून इथला तरुण बाहेर जातो. त्याला रोजगार इथेच मिळाला पाहिजे, असं नियोजन केलं पाहिजे,’ असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केलं.